मंत्राचा अर्थ : विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरूप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो.
तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो. त्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. आमची सत्कर्मे -सद्विचार-सदाचार-संभाषणे सद्वर्तनाकडे प्रवृत्त होवोत. [२]
गायत्री मंत्रात परब्रह्माचे म्हणजे सात्याचे स्मरण करताना आपल्या डोळ्याना दिसणारा सूर्यच समोर आणायचा असतो. तो सविता आमच्या सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा देवो अशी प्रार्थना यामध्ये करायची असते.