Maharashtra And Kamgar Day

आपण १ मे हा दिवस “महाराष्ट्र दिन” आणि “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा करतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून साजरा करतो हे समजलं पण “जागतिक कामगार दिन” हा सुद्धा १ मे रोजीच का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो. त्यासाठीच त्याची पूर्वपीठीका काय आहे ते थोडक्यात समजावून घेण्याचा प्रत्यत्न करणार आहोत.

दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो. तसेच १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो.

कामगार दिन कसा सुरू झाला?

औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१पासून १ मे हा कामगारदिन पाळण्यात येतो.

कामगारांच्या प्रमुख मागण्या कोणत्या होत्या :-

१. कायद्याने ८ तासांचा दिवस
२. लहान मुलांना कामाला लावण्यावर बंदी
३. महिला कामगारांच्या कामावर मर्यादा
४. रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम
५. कायद्याने साप्ताहिक सुट्टी
६. कामाचा मोबदला वस्तुच्या रूपात न देता नगद द्यावा.
७. समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य. कामगारांच्या प्रमुख माग
्या होत्या

देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी जगातील ८0 देशांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते. कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणार्‍या कामगारांचा गौरव करण्यात येतो.

अनेक वर्षानंतर अधिकाधिक देशांतले कामगार १ मे दीनाच्या सोहळ्यात सामील होत गेले आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिन साजरा करु लागले. १ मे दिवस आंरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार १ मे दिवसात होऊ लागला. १ मे दिवस ही सगळ्या कामगार चळवळीची परंपरा झाली. १९०५ च्या १ मे या दिवसासाठी लेनिनने लिहिलेल्या पत्रकात म्हटले होते, “कामगाराकामगारात, राष्ट्राराष्ट्रात, धर्माधर्मात असणारे शत्रुत्व नष्ट करा. या शत्रुत्वाने फक्त लुटारूंचा आणि जुलूमशहांचाच फायदा होतो, कारण ते कामगारवर्गातील अज्ञातावर आणि दुफळीवरच जगत असतात. ज्यू आणि ख्रिश्चन, फिन आणि स्वीडश, आर्मेनियन आणि तातार, पोलिश आणि रशियन, ल्याटिन आणि जर्मन सारे भेदभाव विसरून समाजवादाच्या एका झेंडयाखाली आपण सारे आगेकूच करूया. सर्व देशातील कामगारांची ही ऐक्यशक्ती, आंतरराष्ट्रीय समाजवादाची संघशक्ती, १ मे दिनाला आपल्या दलांची पाहणी करते आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यासाठीचा लढा निर्धाराने आणि अविचलपणे पुढे नेण्यासाठी आपले बल संघटीत करते.”

वर्षे लोटली तशतशा अधिकाधिक देशांतल्या तुकडया १ मे दिनाच्या सोहळ्यात सामील होत गेल्या आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिवस साजरा करु लागले आणि १ मे दिवस आंरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार १ मे दिनात होऊ लागला. १ मे दिवस ही सर्व कामगार चळवळीची परंपरा झाली.

भारतातील पहिला कामगार दिन :-

भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.

महाराष्ट्र दिन शुभेच्छा (Maharashtra Day Wishes In Marathi)

महाराष्ट्र दिन साजरा करण्याठी आपण आपल्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवतो यासाठी हे महाराष्ट्र दिवस शुभेच्छा तुमच्या नक्कीच फायद्याचे आहेत. 

  • जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी… मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
  • प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा ! महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा
  • मंगल देशा… पवित्र देशा… महाराष्ट्र देशा…प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • गर्जा महाराष्ट्र माझा…. जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा
  • राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा…. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
  • कपाळी केशरी टिळा लावितो… महाराष्ट्र देशा तुला वंदितो…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा… जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • ज्ञानाच्या देशा ,प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा… महाराष्ट्र  दिनाच्या शुभेच्छा  
  • महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्व मराठी बांधवाना मनपूर्वक शुभेच्छा 

कामगार दिनाच्या शुभेच्छा (International Labour Day Wishes)

१ मे हा दिवस आंतरराष्टीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. यासाठी कामगार दिनासाठी शुभेच्छा संदेश 

  • सर्व कष्टकरी, श्रमिकांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • एकजुटीने काम करू कामावरती प्रेम करू कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • काम करा हो काम करा कामावरती प्रेम करा…. कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • कष्टाची भाकर मिळते कामातून, काम करा आणि मोठे व्हा… महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • शेतकरी ते कष्टकरी प्रत्येकाला कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • दिवस हक्काचा… दिवस कामगारांचा… कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • कामगार कल्याणाचे राखू धोरण, करू या महाराष्ट्राचे निर्माण … कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • काम असे करा की लोकांना म्हणायला हवं काम करावं तर यानेच… कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • कराल कष्ट तर होईल दारिद्र्य नष्ट… कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • सर्व कामगार बंधू आणि भगिनींना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Like Our Facebook Page – Rachana Sadhana

Maharashtra And Kamgar Day Maharashtra And Kamgar Day Maharashtra And Kamgar Day Maharashtra And Kamgar Day Maharashtra And Kamgar Day Maharashtra And Kamgar Day Maharashtra And Kamgar Day

About the author

admin

Leave a Comment

error: Content is protected !!