कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहेत.

आपणास माहिती आहे का कासव (मादी) ही आपल्या पिल्यांना कधीच दुध पाजत नसते तिने आपल्या पिल्लाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लाचे पोट भरते त्या प्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्या कडे वात्सल्य भावनेने पाहावे ज्यामुळे न मागता आपल्या सर्व ईच्छा पुर्ण व्हाव्या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते.

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. कासवाला श्री विष्णूकडून तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते.कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे.
कासव हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.

काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्‍णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

कासवाने श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला मंदिरात गाभार्याच्या समोर स्थान प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असते.

कासवाचे गुण

1) कासवाला ६ पाय असतात तसेच माणसाला ६ शत्रु असतात

काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर
कासव हे सर्व सोडुन नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडुन मंदिरात यावे

2) कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातुन प्रेम देवून वाढवते त्याच प्रमाणे देवाने आपल्या वर क्रूपा द्रुष्टी ठेवावी ही भावना आहे.

3) कासव आपली अष्ट अंग नमस्कार करते त्याप्रमाणे आपण पण करावा यांकरीता कासव मंदिरात असते.

४) कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते त्याप्रमाणे मंदिरात देवासामोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही हे कासव आपल्याला शिकवते.

कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ

कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते’, असा आहे.

त्या प्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्या कडे वात्सल्य भावनेने पाहावे ज्यामुळे न मागता आपल्या सर्व ईच्छा पुर्ण व्हाव्या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते.

  • आपल्या घरात पितळाचे कासव ठेवावे कूर्म म्हणजे श्रीविष्णूला आपल्या घरात ठेवल्याने श्रीविष्णू सोबत श्रीमहालक्ष्मी वास आपल्या घरात राहतो
  • घरात देवा समोर अथवा तिजोरी समोर उत्तर दिशेला तोंड करून पाण्यात ठेवावे त्यातील पाणी रोज पुर्ण घरात शिंपडावे
  • आपण यश मिळविण्यासाठी अपार मेहनत करतो. दिवस-रात्र एक करतो. तरीही अनेकदा यश मिळत नाही. अनेकदा याचे मुख्य कारण तुमच्या घरातही असू शकते.
  • वास्तुदोष असल्यास तुमच्या वाटचालीत अडथळे निर्माण होऊ शकतात. हे दोष दूर करण्यासाठी आधार घ्यायला हवा.साधनांच्या आधारे आपल्या यशातील अडथळे दूर करता येतात.
  • वास्तुदोष दूर करण्यासाठी कासव फार गुणाचे आहे. घरात कासव असेल तर घरातील रोग व शत्रू दूर रहातात.
  • करीयर किंवा नोकरीत पुढे जाण्यासाठी धातुनिर्मित कासव घरात आणा. त्याला पाणी भरलेल्या जारमध्ये किंवा भांड्यात ठेवून उत्तर दिशेला ठेवा.
  • कासव स्वतः दीर्घायुषी (120 वर्ष आयुष्य आहे कासवाला) असते. त्यामुळे घरातील व्यक्तींनाही दीर्घायुष्य लाभते

About the author

admin

Leave a Comment

error: Content is protected !!