स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे, त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकटले, तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी –
शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तीनापूर पासून १२ कोस (जवळपास २४ कि.मी.अंतरावर) छेली खेडा नावाचे गाव होते. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजयबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाहीबरोबर मिसळायचा नाही, तर तिथून थोडय़ाशा अंतरावर असणा-या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती, तर तो विजयसिंग खूप खिशात गोटय़ा भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा, पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वत:वरच घेऊन खेळायचा. असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला, तर तो दिवस होता चित्र शुद्ध द्वितिया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला. गणपतीबरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि सर्व गोटय़ा त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही. आज तूच खेळायचं बस इतके त्यांच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय, पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक ८ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे-तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजयसिंग गोटय़ा खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामिनी त्याला गोटय़ा उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन तिथून ते गुप्त झाले.
थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तीनापूरपासून १२ कोस (जवळपास २४ कि.मी. अंतरावर) छेली खेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा, असा झाला. कोकणातील हरिभाऊ (स्वामिसूत) हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापुरतीसाठी, तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामिनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले आणि सांगितले की, आजपासून तू माझा सूत झालास, सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर, हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले. कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत, हे पाहून त्यांना थोड रडू कोसळलं, तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की, रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे. त्याच्यावर हात फिरव बघू. आणि ज्यावेळी हरिभाऊनी तसे केले, त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला, विजयसिंग म्हणजे दुसरा तिसर कोणी नाही तर तो स्वामीसुतांचाच पूर्व अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला.
आणि या गोष्टीला स्वत: स्वामिनी मान्यता दिली आहे ती पुढीलप्रमाणे. स्वामी प्रकटदिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामीना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामीभक्त होते ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते, तर ते पिंगला ज्योतिष्य विद्येत पारंगत होते. स्वामीनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केल आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर होता, तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामीनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद-कुंकू, अक्षता, तुळस, फुले वगैरे वाहून सर्व दैवतानी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामी खूप खूश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्याच्या ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटल.े स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हायतीपर्यंत होते त्यांच्या हातावर. याचाच आर्थ स्वामीनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरीत्या स्वामीसुतानी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटन्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे.
स्वामी समर्थ महाराज काद्र्लीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वत:चे खरे नाव, ओळख लपवून चंचलभारती, दिगंबर बुवा आशा नावानेसुद्धा कार्यरत होते.
