दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकटविमोचन स्तोत्र.
या स्तोत्राची रचना नारेश्वरनिवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. हे स्तोत्र ‘सईज’ या गावी (ता. कलोल, जि. मेहसाणा, गुजरात) संवत/शके १९९१ माघ शु. प्रतिपदा सोमवार ता. ४/२/१९३५ रोजी रचण्यात आले. सईज या गावाबाहेरच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशालेमधे या स्तोत्राची रचना झाली. मूळ दत्तबावनी गुजराती आहे. आपण पाहूया मूळ दत्तबावनी आणि त्याचा मराठी अर्थ;

श्री दत्तबावनी

जय योगीश्वर दत्त दयाळ| तु ज एक जगमां प्रतिपाळ ||१||
हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तुच एकमात्र या जगामधे रक्षणकर्ता आहेस.

अत्र्यनसूया करी निमित्त| प्रगट्यो जगकारण निश्चित||२||
अत्रि ऋषी आणि अनसूयामाता यांना निमित्त करुन या जगासाठी खरोखर तु प्रगट झाला आहेस.

ब्रम्हाहरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार ||३||
तु ब्रम्हा, विष्णु आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तु या भवसागरातुन तारुन नेतोस.

अन्तर्यामि सतचितसुख| बहार सद्गुरु द्विभुज सुमुख् ||४||
तू अंतरंगात सच्चिआनंदरुपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरुपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रुप आहेस.

झोळी अन्नपुर्णा करमाह्य| शान्ति कमन्डल कर सोहाय ||५||
तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपुर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमण्डलु शांतीचे प्रतिक आहे.

क्याय चतुर्भुज षडभुज सार| अनन्तबाहु तु निर्धार ||६||
कधी तु चतुर्भुज स्वरुपात असतोस तर काही वेळेस तु षड भुजा धारण करतोस, पण खरे पाहता तु अनंतर बाहुधारी आहेस.

आव्यो शरणे बाळ अजाण| उठ दिगंबर चाल्या प्राण ||७||
मी अजाण बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा! तू उठ. आता प्राण जाईल अशी स्थिती आहे.

सुणी अर्जुण केरो साद| रिझ्यो पुर्वे तु साक्शात ||८||
दिधी रिद्धि सिद्धि अपार| अंते मुक्ति महापद सार ||९||

पुर्वी तु सहस्त्रार्जुनाचा धावा ऐकुन प्रसन्न झाला होतास आणी त्याला ऋद्धी- सिद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते.

किधो आजे केम विलम्ब| तुजविन मुजने ना आलम्ब ||१०||
मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही.

विष्णुशर्म द्विज तार्यो एम| जम्यो श्राद्ध्मां देखि प्रेम ||११||
विष्णुशर्मा ब्राम्हणाचे प्रेम बघुन तु श्राद्धामधे जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास.

जम्भदैत्यथी त्रास्या देव| किधि म्हेर ते त्यां ततखेव ||१२||
विस्तारी माया दितिसुत| इन्द्र करे हणाब्यो तुर्त ||१३||

जंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तुच त्यांना ताबडतोब मदत केली होती. तु त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास.

एवी लीला क इ क इ सर्व| किधी वर्णवे को ते शर्व ||१४||
अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने (शर्व) केल्या आहेत. यांचे वर्णन कोण करु शकेल?

दोड्यो आयु सुतने काम| किधो एने ते निष्काम ||१५||
आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम (कामनारहित) केले.

बोध्या यदुने परशुराम| साध्यदेव प्रल्हाद अकाम ||१६||
यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तु उपदेश केला होता.

एवी तारी कृपा अगाध| केम सुने ना मारो साद ||१७||
अशी तुझी अगाध कृपा असतांना, तु माझी हाक मात्र का ऐकत नाहीस?

दोड अंत ना देख अनंत| मा कर अधवच शिशुनो अंत ||१८||
हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहु नकोस. या बालकाचा असा मधेच अंत करु नकोस.

जोइ द्विज स्त्री केरो स्नेह| थयो पुत्र तु निसन्देह ||१९||
ब्राम्हण स्त्रीचे प्रेम पाहुन तु खरोखर तिचा पुत्र झालास.

स्मर्तृगामि कलिकाळ कृपाळ| तार्यो धोबि छेक गमार ||२०||
स्मरण करतास धावणारा तु, कलियुगामधे तारुन नेणारा, हे कृपाळू, तु तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस.

पेट पिडथी तार्यो विप्र| ब्राम्हण शेठ उगार्यो क्षिप्र ||२१||
पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राम्हणाला तु तारलेस, आणि व्यापारी ब्राम्हणशेठला वाचवलेस.

करे केम ना मारो व्हार| जो आणि गम एकज वार ||२२||
मग देवा, तु माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा!

शुष्क काष्ठणे आंण्या पत्र| थयो केम उदासिन अत्र ||२३||
वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तु का उपेक्षा करत आहेस

जर्जर वन्ध्या केरां स्वप्न| कर्या सफळ ते सुतना कृत्स्ण ||२४||
हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देउन तु तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पुर्ण केलेस.

करि दुर ब्राम्हणनो कोढ| किधा पुरण एना कोड ||२५||
दत्तात्रेय प्रभू! तु ब्राम्हणाचे कोड बरे करुन त्याची मनीची इच्छा पुर्ण केलीस.

वन्ध्या भैंस दुझवी देव| हर्यु दारिद्र्य ते ततखेव ||२६||
हे प्रभू! आपण वांझ म्हशीला दूभती केलीस आणि त्या ब्राम्हणाचे दारिद्र्य दूर केलेत.

झालर खायि रिझयो एम| दिधो सुवर्ण घट सप्रेम ||२७||
श्रावणघेवड्याच्या शेंगांची भाजी खावुन, आपण त्या ब्राम्हणाला प्रेमपुर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात.

ब्राम्हण स्त्रिणो मृत भरतार| किधो संजीवन ते निर्धार ||२८||
ब्राम्हण स्त्रीच्या मृत पतीला तु पुन्हा जीवित केलेस.

पिशाच पिडा किधी दूर| विप्रपुत्र उठाड्यो शुर ||२९||
पिशाच्च पीडा दुर करुन, तु मृत ब्राम्हण पुत्र पुनश्च जीवंत केलास.

हरि विप्र मज अंत्यज हाथ| रक्षो भक्ति त्रिविक्रम तात ||३०||
हे मायबाप! तु एका हरिजनाचे माध्यमातुन ब्राम्हणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस.

निमेष मात्रे तंतुक एक| पहोच्याडो श्री शैल देख ||३१||
तंतूक नामक भक्ताला तु एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोहोचवुन दिलेस.

एकि साथे आठ स्वरूप| धरि देव बहुरूप अरूप ||३२||
संतोष्या निज भक्त सुजात| आपि परचाओ साक्षात ||३३||

हे प्रभो, तु निर्गुण असुनही अनेक रुपे धारण करु शकतोस. त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तु सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली.

यवनराजनि टाळी पीड| जातपातनि तने न चीड ||३४||
हे देवा! तु यवन (मुसलमान) राजाची शारीरिक व्याधी दूर करुन तु जातीभेद किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवुन दिलेस.

रामकृष्णरुपे ते एम| किधि लिलाओ कई तेम ||३५||
हे दत्त दिगंबरा! तु राम व कृष्णाचा अवतार धारण करुन अनेक लीला केल्या आहेस.

तार्या पत्थर गणिका व्याध| पशुपंखिपण तुजने साध ||३६||
दत्तात्रेय प्रभो, दगड,शिकारी इ.चा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.

अधम ओधारण तारु नाम| गात सरे न शा शा काम ||३७||
हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही?

आधि व्याधि उपाधि सर्व| टळे स्मरणमात्रथी शर्व ||३८||
हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधि-व्याधी, आणि सर्व उपाधी नष्ट होतात.

मुठ चोट ना लागे जाण| पामे नर स्मरणे निर्वाण ||३९||
तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इ. प्रकारचा त्रास होत नाही, आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो.

डाकण शाकण भेंसासुर| भुत पिशाचो जंद असुर ||४०||
नासे मुठी दईने तुर्त| दत्त धुन सांभाळता मुर्त ||४१||

या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकिण, शाकिण, महिषासुर, भूत-पिशाच्च, जंद, असुर पळुन जातात.

करी धूप गाये जे एम| दत्तबावनि आ सप्रेम ||४२||
सुधरे तेणा बन्ने लोक| रहे न तेने क्यांये शोक ||४३||
दासि सिद्धि तेनि थाय| दुःख दारिद्र्य तेना जाय ||४४||

जो कोणी धूप लावुन ही दत्तबावनी प्रेमपुर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्षप्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दु:ख रहात नाही. सिद्धी जणु त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही.

बावन गुरुवारे नित नेम| करे पाठ बावन सप्रेम ||४५||
यथावकाशे नित्य नियम| तेणे कधि ना दंडे यम ||४६||

जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करुन नेहमी
दत्तबावनीचे बावन्न पाठ श्रद्धापुर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही.
दत्तात्रेय प्रभो, दगड, शिकारी इ.चा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.

अनेक रुपे एज अभंग| भजता नडे न माया रंग ||४७||
हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरुपात असला तरी त्याचे मूळ स्वरुप कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्त प्रभुंची उपासना करतांना माया-मोह त्रास देत नाहीत.

सहस्त्र नामे नामि एक| दत्त दिगंबर असंग छेक ||४८||
दत्तात्रेयाला अनेक विध नामे असुनही तो मात्र दत्त दिगंबर एकच अाहे आणि तो सर्व माया मोहापासुन दूर अलिप्त आहे.

वंदु तुजने वारंवार| वेद श्वास तारा निर्धार ||४९||
हे प्रभो, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या श्वासातुनच प्रगट झाले आहेत हे निश्चित!

थाके वर्णवतां ज्यां शेष| कोण रांक हुं बहुकृत वेष ||५०||
जेथे हे दत्तात्रेया, तुझे वर्णन करतांना शेष सुद्धा थकुन जातो, तेथे अनेक जन्म घेणार्‍या माझ्यासारख्या पामराची काय कथा?

अनुभव तृप्तिनो उद्गार| सुणि हंशे ते खाशे मार ||५१||
दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टिकाकाराच्या दृष्टीकोनातुन कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल.

तपसि तत्वमसि ए देव| बोलो जय जय श्री गुरुदेव ||५२||
श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रम्हस्वरुप आहेत. म्हणुन सर्वांनी आवर्जुन ‘जय जय श्री गुरुदेव’ म्हणावे

॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥

About the author

admin

Leave a Comment

error: Content is protected !!